भुसावळ –

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सीआरएमएसच्या जनरल शाखेची विशेष सभा आज दि.२० आॅगस्ट रोजी झाली. या. सभेत मंडळ अध्यक्ष व्ही. के. समाधिया, मंडळ सचिव एस.बी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एनआरएमयू तथा इतर युनियनमधील पदाधिकार्यांनी सीआरएमएसमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये मुख्यत: श्रीमती अलका चौधरी नर्सिग मेट्रॉन, रामजी चिफ फार्मासिस्ट, कुंजबिहारी सी.एन.एस,उज्वल करोसिया,जयदेव एच आय तथा अन्य सदस्यांना पुष्पहार, टोपी, कार्ड,पेन व डायरी देऊन स्वागत करण्यात आले. श्री.समाधिया, श्री.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन सीआरएमएस मध्ये औपचारिक जाहीर प्रवेश करण्यात आला.
याप्रसंगी श्री. समाधिया, श्री. एम
एस.बी.पाटील,कुंदलता धुळ, अलका चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रवेश कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा सचिव दीपक शर्मा,शाखाध्यक्ष पी.के.गुप्ता, मंडळ संघटक श्री. रायकवार यांनी नियोजन केले. यावेळी ए.के.तिवारी,रईसा बानो, श्रीमती बेबीबाई,ए.जी.सोनवणे, किरण बढे,ए.के.सिंह,सत्यमेव सिंह,नंदकिशोर,कुणाल निकम, सुभान गवळी, मुकेश यादव, सुरेश जैसवाल व जनरल शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


