भुसावळ स्थानक गजबजू लागले ;बससेवा सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा ;भाड्यात वाढ नाही :


भुसावळ (प्रतिनिधी ) –
कोरोना विषानूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता गेल्या २३ मार्च पासुन लॉक डाऊन सुरु आहे यामुळे बंद असलेली बससेवा तब्बल पाच महिन्यानंतर २० आँगस्ट पासुन सुरू करण्यात आल्याने भुसावळ बस स्थानकांत प्रवाशांची वर्दळ दिसून आली .अखेर बससेवा सुरुं झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे .
एस.टी.च्या भाड्यात कोणतीही वाढ महामंडळ प्रशासनाने केली नसल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे .
मिशन बिगेन अगेन सहा अंतर्गत राज्य सरकारने एक परीपत्रक जारी केले असुन २० आँगस्ट पासुन राज्यातील बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे .यामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे . एस.टीच्या प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नाही . प्रवासात प्रवाशांनी कोविड 19 च्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे .
बससेवा सुरु करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी डफली बजाओ आंदोलन केले होते .
बससेवा सुरू झाल्याने खाजगी ट्रँव्हल व इतर वाहनांकडुन प्रवाशांची होणारी भाडेवाढीची लुटमार थांबणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *