कोरोना योद्ध्यांचा सन्मान ; कंडारी ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र व साडीचोळी देऊन गौरव


जळगाव –
कोरोना कालावधीत कंडारी गावात घरोघरी भेटी, सर्वेक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावीपणे अंमलबजावणी यासह जनजागृती करून कोरोनामुक्त कंडारीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध विभागातील व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला असल्याचे सरपंच नथाबाई गवळे यांनी सांगितले.
कोरोना कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जळगाव तालुक्यातील कंडारी येथील ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध विभागात कार्यरत व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कंडारी ग्रामपंचायतीच्या सरपंच नथाबाई गवळे, उपसरपंच सुपडू मालचे, ग्रामसेवक राहूल चौधरी, ग्रा.पं. सदस्य माणिकराव सुर्वे, संगीता सोनवणे, प्रकाश पाटील, सुधीर सुर्वे, डिगंबर सुर्वे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत व आरोग्य विभागात काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात आरोग्य केंद्राचे डॉ. सुनील ढाके, नर्स रजिया पटेल, प्रतिभा सूर्यवंशी, आशासेविका संगीता देशमुख, भारती सुर्वे, वैशाली सुर्वे, ग्रा.पं. लिपीक गोपाळ रिवाजकर, शिपाई प्रविण सुर्वे, पाणीपुरवठा कर्मचारी श्याम निकम, ग्रामसेवक राहूल चौधरी यांना सरपंचांसह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन तर वसंतराव पाटील यांच्यातर्फे आशासेविकांना साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन राहुल चौधरी यांनी तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *