बंदुकीचा धाक दाखवून मोबाईल चोरणारा फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
बंदुकीचा धाक दाखवून मोबाईल मारहाण करीत मोबाईल घेवून पसार झालेल्या आरोपी तीन महिन्याने येथील स्टेशन परिसरात रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी व रेल्वे पोलिसांच्या मदतीने बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले .
याबाबत भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरन ०६६७/२०२० भा द वि कलम ३९४ , ३२३, ५०४, ५०६, ३४ कायदा कलम-३ /२५ प्रमाणे दिनांक २२ मे २०२० रोजी २ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी राजेश रमाशंकर दुबे रा.शनिमंदिर वॉर्ड भुसावळ हे दिनांक २१जून २०२० रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास त्याचे भाऊ संतोष दुबे व राहुल चौधरी सोबत भुसावळ शहरात आठवडे बाजारात मध्ये सिमेंट ओटया बसलेले असतांना आरोपी बाबा काल्या व रईस याच्या सोबत दोन जण यांनी फिर्यादिस सिगारेट मागण्याच्या कारणावरून बाबा काल्याने त्याच्या कमरेतून पिस्तुल काढून फिर्यादिस बंदुकीचा धाक दाखवुन तसेच त्याच्या मित्रांनी फिर्यादीचा १५ हजार रुपये कीमतीचा सॅमसंग कंपनीचा एस8 मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन शिवीगाळ व धमकी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी आरोपी शेख रईस शेख रशीद वय-22 रा.जाम मोहल्ला भुसावळ
गुन्हा घडल्यापासून तीन महिन्यांपासून फरार होता . पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून आरोपी याना भुसावळ शहरातून रेल्वे स्टेशन भागातून रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तसेच पोलीस निरीक्षक दिनकर डंबाले नेमणूक लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहायक्क पोलीस निरीक्षक अनिल मोरे, रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी,पो.काॅ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी,श्रीकृष्ण देखमुख, दिनेश कापडने, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे नरेंद्र कुसवा, आर के यादव व भुसावळ लोहमार्ग पोलीसचे पोहेका अजित तडवी,जगदीश ठाकूर यांनी केली असून गुन्हाचा तपास सहायक्क पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *