रावेरला दावते इस्लामी हिंद तर्फे स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण ;


रावेर-
येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७३ व्‍या वर्धापन दिनानिमित्त दावते इस्लामी हिंद तर्फे १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. मिल्लत नगरातील ईदगाह रस्‍त्‍यावर मदरसा गुलशने रजाच्या पटांगणावर सकाळी ८-३० वाजता दावते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद,नगरसेवक सादिक शेख,नगरसेवक असदउल्ला खान,सामाजिक कार्यकर्ता मकबुल शेठ,कालूभाई मनियार, रफिक शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण जगात व भारतात शांतता व समृद्धी आणि कोरोना रोग निर्मूलनासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.सदर कार्यक्रमाच्‍या यशस्वीतेसाठी शेख मुश्ताक मन्यार,सय्यद नजर, हाजी इस्माईल,अब्दुल समद शेख, कामिल मदरशाचे प्रमुख अब्दुल रहीम मसूद अत्तारी, जियाउद्दीन,यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *