भुसावळ (प्रतिनिधी )-
आयुध निर्माणी भुसावळ येथे स्वतंत्रता दिनानिमित्त महाव्यवस्थापक .वसंत निमजे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी त्यांनी उपस्थितांना निर्माणीच्या वर्तमान आणि भविष्य या बद्दल मार्गदर्शन केले निर्माणी तील अधिकारी कर्मचारी व सर्व कामगारांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांनी केलेल्या व करत असलेल्या कामाबद्दल प्रशंशा केली निर्माणी मध्ये ओ.टी व पीस वर्क प्रमोशन,अनुकंपा भरती यासारखी सर्व महत्वपूर्ण मुद्द्यांचे समाधान वेळेवर केल्याबद्दल निर्माणी मध्ये हर्ष उल्हासाचे वातावरण आहे कोविड १९ कोरोना योद्धा यांनी महत्वपूर्ण कामगिरी केल्या बदल यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले . यासह निर्माणी मधील सर्व उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.तसेच दहावी आणि बारावी मध्ये चांगले उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले . याप्रसंगी आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक वसंत निमजे.
अप्पर महाव्यवस्थापक .सुधीर मलिक
संयुक्त महाव्यवस्थापक.नीलाद्री बिस्वास. संदिप आडे सर्व अधिकारी व कर्नल सुरक्षा अधिकारी ए.एस. देशपांडे
सहाय्यक वित्त एव लेखा अधिकारी एन.डी.कुलकर्णी
वरिष्ठ लेखा अधिकारी पी.एस.अनंतमूर्ती
मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर पि.के बिस्वास.
महिला कल्याण समिती अध्यक्षा श्रीमती वैजयंती निमजे व महीला पदाधिकारी. ऑ.फॅ.प्रायमरी शाळा वअंकुर विद्या मंदिर मुख्याध्यापिका व सर्व युनियन असोसिएशन चे पदाधिकारी
जे.सी.एम. थ्री व फोर्थ चे मेंबर कार्यसमितिचे मेंबर उपस्थित होते
.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थापना अनुभाग . आणी वाय.अँड.इ आणि इ.एम व बी.एम आणि फायर ब्रिगेड व सुरक्षा विभाग छायाचित्रकार या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले .यावेळी ओम प्रकाश स्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कोविड-19 कोरोना वायरस महामारी मुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.


