भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील खडका शिवारातील सर क्लायमेंट इग्लिश स्कूल मध्ये ७४ वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला . प्रसंगी एसबीएन मराठी चँनलचे भुसावळ तालुका प्रतिनिधी सुनिल आराक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी शासनाच्या नियमाचे पालन करण्यात आले .
याप्रसंगी शाळेचे चेअरमन जी.बी.खान , अमिर खानसर , शाळेच्या प्रिन्सिपल शिल्पा आराक शिक्षिका वैशाली खराडे , शिरीन शेख यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळेचे आवार नेहमी विद्यार्थ्यांनी गजबजलेले मात्र यंदा प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळेत विद्यार्थी नसल्याने विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवत होती शाळेच्या आवारात शुकशुकाट दिसुन आला.



