भुसावळ (प्रतिनिधी)-
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मध्य रेलवे भुसावळ विभागामध्ये दिनांक 10 ते दिनांक 16 ऑगष्ट
पर्यन्त स्वछता अभियान चालवले जात आहे .
हे अभियान मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शन नुसार राबवले जात आहे . दिनांक 11ऑगष्ट मंगळवार रोजी भुसावळ स्टेशन स्वछता अभियान करण्यात आले . स्टेशन प्रबंधक स्टेशन कर्मचारी या सर्वानी या अभियान सहभाग नोंदविला . प्रवाशांमधे जनजागृति करुन त्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले जात आहे . येथे भुसावळ मंडळ तिल सर्व स्टेशन , बाहेरील परिसर , स्टेशन कार्यालय , ट्रॅक( विशेष लक्ष ) दिले जाणार आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून मास्क आणि सॅनिटायजर व सामाजिक अंतर ठेऊन हे अभियान राबवले जात आहे.



