भुसावळ (प्रतिनिधी)-
रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यासाठी रोटरी क्लबने वृक्षारोपण करून वृक्ष सवर्धनाचा ध्यास घेतला आहे यानिमित्त रोटरी क्लब सदस्याच्या वाढदिवसानिमित्त त्या सदस्याच्या घराच्या परिसरात त्यांच्या हातून वृक्षरोपण करण्याचा आगळावेगळा उपक्रम रोटरीचे अध्यक्ष गजानन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे .
याच अनुषंगाने रोटरीचे सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त रोटेरियन हेमंत नाईक, विकास कात्यायनी, नीता चोरडिया यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ भुसावळच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट गजानन ठाकूर, रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट ओम राजेश अग्रवाल, महेश भराडे, प्रदीप दवे, रोटेरियन सतीश अग्रवाल, प्रकाश ठाकूर, राजेंद्र पाटील, गोपीनाथ अय्यर, रोटेरियन नगरसेवक बोधराज चौधरी, रोटेरियन सारंग चौधरी इत्यादी उपस्थित होते.



