लिंगायत कोष्टी समाजाच्यावतीने राष्ट्रीय हातमाग विणकर दिन उत्साहात साजरा…

      

भुसावळ (प्रतिनिधी)- हातमाग विणकर कोष्टी समाज सेवा मंडळाने ७ ऑगस्ट रोजी गरुड प्लॉट येथे राष्ट्रीय हातमाग विणकर दिन साजरा करण्यात आला. प्रथम कोरोना महामारीत आपले कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या कोरोना योध्दा डॉक्टर, पोलिस, समाज बांधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले संस्थेचे अध्यक्ष . विनयकुमार कोष्टी व उपाध्यक्ष राजेश कोष्टी यांनी राष्ट्रीय हातमाग विणकर दिनाचे महत्व अतिशय मार्मिक शब्दांत उपस्थितांना विशद केले. राष्ट्रीय हातमाग विणकर दिनानिमित्त लिंगायत समाजतील कोरोना योध्दा सुनिता विनंते, नलिनी कानडे, संगिता कोष्टी, नानासाहेब घोडके व किरण सरवदे यांच्या घरी जावून त्यांना प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव माधव गरुडे यांनी सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतिष घोडके, दिपक विनंते, मुकेश कोष्टी, दिपक कोष्टी, अविनाश सरोदे आदी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *