कोडॅक इंडियाचे अँड्रॉइड टीव्ही निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल..! टीव्हीं निर्मितीमध्ये 50-60 टक्के मूल्य वाढ करण्याचे ध्येय

मुंबई :
कोडॅक टीव्ही इंडियाने नुकतेच  त्यांच्या “मेक इन इंडिया ”  या त्यांच्या वचनबध्दतेला बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या अ‍ॅन्ड्रॉइड प्रमाणीकरणाचा लाभ घेण्यासाठी पुढील तीन वर्षांमध्ये उत्तरप्रदेशातील हापूरमध्ये पूर्णपणे स्वयंचलित टीव्ही निर्माण करण्याचा प्लांट स्थापित करण्यासाठी रु. 500 कोटींहून अधिकची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
भारतामध्ये अ‍ॅन्ड्रॉइड टीव्ही उत्पादने विकसित करणे आणि त्यांची चाचणी करण्यासाठी आणि इतर देशांवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी नवीन कोडॅक टीव्ही इंडिया निर्माण प्लांट वापरला जाईल. देशामध्ये टीव्ही निर्मितीमध्ये गुंतवणूक करणार्‍या पहिल्या भारतीय कंपन्यांपैकी एक बनण्याचे आणि परवडण्याजोग्या स्मार्ट टीव्ही क्षेत्रामध्ये अग्रणी निर्मात्यांपैकी एक म्हणून त्यांचे स्थान आणखी मजबूत करण्याचे कोडॅक टीव्ही इंडियाचे ध्येय आहे. 
अवनित सिंह मारवाह, भारतामधील एक्सक्लुसिव्ह कोडॅक ब्रॅन्डचे परवानाधारक, सुपर प्लास्टोनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि सीइओ अवनित सिंह मारवाह याबाबत माहिती देताना म्हणाले कि,  “सध्या, भारतीय टीव्ही उद्योग बहुतांश कच्चा माल आयात करतो आणि त्यामुळे मूल्यामध्ये केवळ 10-12 टक्के इतकी वाढ होते. तरीही, या गुंतवणूकीसह, कोडॅक HD LED TV ने 50-60 टक्के इतके मूल्य वर्धन करण्याचे ध्येय ठेवले आहे. नवीन प्लांट आणि आर आणि डी सेंटर तंत्रज्ञानाने चालवली जाणार्‍या उत्पादनांची निर्मिती करण्यास आणि मेक इन इंडियाशी संरेखित अधिक निर्मिती लाईन्स सुरू करण्यास मदत करेल.” असेही त्यांनी सांगितले.
पूर्ण पार्श्व एकत्रीकरणासह प्रमाणित अ‍ॅन्ड्रॉइड टीव्ही निर्मिती प्लांट आणि संशोधन आणि विकास केंद्र 2021पर्यंत सुरू होईल. वार्षिकरित्या लाखो टीव्ही सेट्स उत्पादित करण्याच्या क्षमतेसह, नवीन सुविधा ही दोन पूर्णपणे स्वयंचलित, AI सक्षम निर्माण लाईन्सने सुसज्ज असणार आहे जे जवळपास स्पर्शरहित उत्पादनाची सुविधा देणार आहे. ही सुविधा COVID-19 महामारी नंतर उत्पादन आणि कर्मचार्‍याची सुरक्षिततेसाठी सर्व आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचेही पालन करणार आहे.
उत्पादनाच्या वाढलेल्या क्षमतेमुळे कोडॅक टीव्ही इंडिया त्यांचे टीव्ही इतर प्रमुख अ‍ॅन्ड्रॉइड टीव्ही बाजारांना निर्यात करू शकेन.
मार्च 2020 मध्ये सुरू केलेल्या कोडॅक CA सिरीज आणि अलिकडेच सुरू केलेल्या 7XPRO मॉडेलला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. COVID-19 जागतिक महामारी असूनही, संचालन पुन्हा सुरू झाल्यानंतर कोडॅक टीव्ही इंडियाने वाढत्या मेक इन इंडिया भावना आणि त्यांच्या आक्रामक किमतींमुळे त्यांच्या विक्रीवर 65 टक्के प्राप्ती केली आहेत.
आज आम्ही भारताच्या पहिल्या CRT आणि LED टेलेव्हिजन्समधील OEM पैकी एक आहोत. आमच्याकडे नोएडा, उना आणि जम्मू येथे स्थिती 3 निर्मिती प्लांट्स आहेत. आमच्याकडे भारतभरामध्ये 1000 च्या वर कर्मचारी आहेत आणि आमच्या वृध्दीसह त्यांची संख्याही वाढतच आहे.
कोडॅक टीव्ही इंडिया विषयी:
कोडॅक टीव्ही इंडिया ही इमेजिंगवर केंद्रीत तंत्रज्ञान कंपनी आहे. आम्ही ग्राफिक आर्ट्स, कमर्शियल प्रिंट, प्रकाशने, पॅकेजिंग, एंटरटेनमेंट आणि व्यावसायिक फिल्म्स आणि ग्राहक उत्पादन बाजारांमध्ये ग्राहकांना हार्डवेअर- सॉफ्टवेअर, उपभोग्य वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी इतर नाविण्यपूर्ण कंपन्यांसोबत प्रत्यक्ष आणि पूर्ण भागीदारी पूरवतो. आमच्या जागतिक दर्जाच्या संशोधन आणि विकास क्षमता, नाविण्यपूर्ण उपाय पोर्टफोलियो आणि अत्यंत विश्वसनीय ब्रॅन्डसह, कोडॅक जगभरामधील ग्राहकांना त्यांचा स्वत:चा व्यवसाय शाश्वततेने वाढवण्यास आणि त्यांच्या जीवनाचा आनंद घेण्यास मदत करत आहे. कोडॅकवरील अतिरिक्त माहितीसाठी, kodak.comवर आम्हाला भेट द्या, twitter वर @KodakPrint ला फॉलो करा, किंवा Facebook वर Kodak मध्ये आम्हाला लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *