भुसावळ (प्रतिनिधी )-
शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षक-पालक आणि विद्यार्थ्यांसाठी वेबिनार च्या माध्यमातून व्याख्यानमालेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने आठवड्याच्या शनिवार व रविवारी सायंकाळी सहा वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे हे शनिवारी आज दिनांक 8 ला पाचवे पुष्प गुंफताना म्युझिक थेरपीस्ट डॉ.संतोष बोराडे हे चला साधू या संगीतातून जीवनाचा आनंद या विषयावर बोलताना संगीतामधून आनंद कसा मिळवायचा तसेच छोट्या-मोठ्या आजारासह असाध्य रोगांवर संगीतातून उपचार कसा करायचा कोणते संगीत ऐकले पाहिजे एकाग्र होण्यासाठी संगीताचे महत्व याबाबतची माहिती देणार आहे तर रविवारी सहावे पुष्प गुंफतांना भारत सरकार व एआयटीई मनुष्यबळ विकास मंत्रालय चे माध्यम सल्लागार विनायक पाचलग हे दररोज वापरणाऱ्या सोशल मीडियाचा विवेकशील व परिणाम कारक वापर या विषयावर बोलणार आहे
हे व्याख्यान झूम ॲप व रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ या फेसबुक पेज वरून लाईव्ह करण्यात येणार आहे या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली ची प्रेसिडेंट सुधाकर सनांसे सेक्रेटरी राम पंजाबी प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे योगेश इंगळे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जीवन महाजन प्रदीप सोनवणे यांनी केले आहे



