प्रदिप साखरे यांची पर्यावरण प्रदूषण मंडळावर राज्य संघटक प्रमुख पदी निवड ;


भुसावळ(प्रतिनिधी)-
येथील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक ,तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष प्रदीप रविंद्र साखरे यांची महाराष्ट्र राज्य निसर्ग सामाजिक व पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश राज्य प्रमुख संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे राज्याचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी प्रदीप साखरे यांची नियुक्ती केली आहे.
याबद्दल त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र मिळाले आहे त्यांना त्यांच्या भावी पुढील वाटचालीसाठी सुद्धा वृक्षमित्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रदिप साखरे यांच्या पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण कार्याची दखल घेत तसेच त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल,व राज्य, राष्ट्रीय पातळीवरील संघटन कार्याच्या कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *