भुसावळ (प्रतिनिधी )-
मोटरसाइकल चोरी करणारा पुणे येथील सराईत गुन्हेगारास भुसावळ येथे मंगळवारी रात्री २ वाजेचे दरम्यान बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी जवळून सुमारे ८० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरन.०७६२/२०२०
भादवि कलम-३७९ प्रमाणे मोटारसायकल चोरी बाबत दिनांक ४ ऑगेस्ट २०२० रोजी १२.४५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन ०३९७ /२०२० भा द वि कलम- ३७९,३४ प्रमाणे मोटारसायकल चोरी बाबत दिनांक ३ ऑगष्ट २०२० रोजी ०६:१३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अट्टल गुन्हेगार समाधान गोकुळ सपकाळे वय २८ रा.कोळीवाडा,गाव फुकणी ता जिल्हा जळगाव ह मु.तुकाई दर्शन हडपसर जिल्हा पुणे यास दिनांक ४ ऑगष्ट २०२० रोजी रात्री २ वाजता सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने पोलीस कस्टडी दरम्यान वरील दोन्ही गुन्ह्यातील चोरीची मोटारसायकल व जळगाव मधून चोरलेल्या मोबाईल काढून दिला आहे
यामध्ये ३५,०००/- रुपये किंमतीची हिरो फॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल जु वा तसेच ३०,०००/- रुपये किंमतीची होंडा ड्रीम युगा कंपनीची मोटार सायकल जु वा आणि १५,०००/-रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण ८०,०००/- रूपयांचा चोरीचा मुद्देमाल आरोपी याच्या कडून हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले ,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके ,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक
भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे,पो हे का सुनील जोशी, पो ना रमण सुरळकर, रविंद्र बिऱ्हाडे, उमाकांत पाटील,किशोर महाजन, समाधान पाटील,पो का विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख,चालक पो हे का अशोक पाटील अशांनी केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पो हे कॉ सुनील जोशी करीत असून यातील आरोपी हा अट्टल गुन्हेगार सराईत मोटारसायकल चोर असून त्यावर जळगाव शहर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे व हडपसर पुणे येथे चार गुन्हे दाखल आहे.



