एक वर्ष कोणतेही मानधन न घेता सेवा करण्याचा रेल्वे अ‍ॅप्रेन्टिसधारकांचा निर्णय ऑल इंडिया रेल्वे अ‍ॅप्रेन्टिसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांची माहिती


भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतातील अ‍ॅप्रेन्टिस धारक हे भारतीय रेल्वे सोबत असून या कोरोनाच्या वैश्विक महामारी मध्ये भारताची आर्थिक तसेच रेल्वे मंत्रालयाची आर्थिक स्तिथी पाहता संपूर्ण भारत भरातील ५० हजार च्या जवळपास रेल्वे अ‍ॅप्रेन्टिस युवक एक वर्ष कोणतेही मानधन न घेता रेल्वेची सेवा करण्यास उत्सुक आहेत. कारण रेल्वे मंत्रालयाला अ‍ॅप्रेन्टिस यूवकांमुळे १५ अरब रुपयांचा फायदा तसेच सुदृढ मनुष्य बळ मिळणार आहे. अशी माहिती ऑल इंडिया रेल्वे अ‍ॅप्रेन्टिस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांनी दिली.
एआएआरएफ महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या दिल्लीच्या निवास स्थानी जाऊन भेट घेऊन रेल्वे कर्मचा-यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या काही मागण्यांना पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्री यांनी हिरवा कंदील दिला आहे. व त्या विषयीचे आदेश सुद्धा रेल्वेमंत्री यांनी रेल्वेबोर्ड तसेच सी आर बी यांना दिले आहे, तसेच अ‍ॅक्ट अ‍ॅप्रेन्टिस च्या मुद्द्यावर सुद्धा महामंत्री यांनी सविस्तर पणे चर्चा करून रेल्वे मंत्र्यांना रेल्वे अ‍ॅक्ट अपेन्ट्रीस विषयी माहिती सांगितली, रेल्वे मध्ये अ‍ॅप्रेन्टिस केलेले युवक हे टेक्निकल तसेच रेल्वेच्या वातावरणाशी यांना सम्पूर्ण माहिती असून रेल्वेला यां अ‍ॅप्रेन्टिस युवकांपासून प्रोडक्शन युनिट मध्ये भरपूर फायदा झालेला आहे व अजूनही होऊ शकतो होऊ शकतो. २० टक्के जो कोटा जो अ‍ॅप्रेन्टिस साठी राखीव ठेवला गेला होता तो पूर्णपणे अयशस्वी झाला असुन अ‍ॅप्रेन्टिस युवकांना यापासून कोणताच फायदा झाला नाही रेल्वे अ‍ॅप्रेन्टिस युवक हे टेक्निकल श्रेत्रातील असून यांना नॉन टेक्निकल चा पेपर घेण्यात आला त्या मुळे ही युवक पास होऊ शकले नाही आणि जे पास झाले त्यांना फिजिकल टेस्ट च्या दरम्यान बाहेर काढले गेले. रेल्वे मंत्री यांनी जेव्हा कोर्टाच्या निकालाची आठवण दिली असता, महामंत्री यांनी सांगितले की, कोर्टाच्या निकालानंतर ही संपूर्ण भारतभरात ५०,००० रेल्वे अ‍ॅप्रेन्टिस युवकांना पक्का रोजगार दिला गेला होता. महामंत्री यांनी सांगितले की, हे नवयुवक आहेत आणि यांनी रेल्वे साठी आपला वेळ दिला असुन रेल्वेच्या सम्पूर्ण वातावरणाची यांना माहिती तसेच जाणीव आहे. यांच्या विषयी सहानुभूती पूर्वक विचार करावा यांना रोजगार देण्यात यावा. या विषयी रेल्वे मंत्री यांनी सांगितले की फेडरेशन तसेच रेल्वे बोर्ड व सी आर बी यांच्या मध्ये चर्चा करून अ‍ॅप्रेन्टिस युवकांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात यावा असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *