भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील आगाखानवाडा भागातील मटन मार्केट जवळ
शासनाने बंदी घातलेल्या जनावरांची कत्तल करून विक्री करण्यासाठी किंवा त्यांचे कत्तली घडवून आणण्याचे उद्देशाने एका पांढ-या रंगाच्या एमएच -४० एन-२९९८ क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप व्हॅनमध्ये जनावरे आणली असल्याची गुप्त बातमी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना मिळाल्यावरून त्यांनी सपोनि.अनिल मोरे व गुन्हे शोध पथकाला पाठवून शहानिशा केली असता एक इसम संशयास्पद गोवंश जातीचे कत्तली केलेल्या जनावरांचे खुरे,हाडे व कातडी विना परवानगी बाळगत असतांना मिळून आल्याने त्यास वाहनासह अटक करण्यात आली आहे.
पोकॉ.श्रीकृष्ण देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरात विना परवानगी शासनाने गोवंश हत्या बंदी घातलेली २० जनावरे विक्री करण्यासाठी किंवा त्यांचे कत्तली घडवून आणण्याचे उद्देशाने दि. २९ जुलै २०२० रोजी रात्री ११-३० वाजेच्या सुमारास एका पिकअप व्हॅनमध्ये जनावरे आणली असल्याची गुप्त बातमी निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्यावरून सपोनि.अनिल मोरे,पोना.रमण सुरळकर,पोना. किशोर महाजन,पोना.समाधान पाटील,पोकॉ.ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी,विकास सातदिवे,श्रीकृष्ण देशमुख यांना घटनास्थळी पाठवून सापळा रचून खात्री केली असता पिकअप व्हॅन जवळ एक इसम संशयास्पद परिस्थितीत हालचाली करीत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.

सदर गाड़ीज़वळ उभ्या असलेल्या सादिक खान रशिद खान(वय ३५)रा.रामटेकपुरा आंबोळी बेस,ता.अकोट,जिल्हा-अकोला यांस पोलिसांनी ताब्यात घेतले. पिकअपला लावलेली ताडपत्री उघडुन दाखविण्याचे सांगताच तो पोलीसांना ” जाने दो ना साहब, हम गरिब लोग है,पेट-पानी के लिए यहा आए है, जो भी बात है वो यही निपटा लेते ‘ असे बोलु लागला. सपोनि.अनिल मोरे यांनी गाडीची ताडपत्री उघडली असता बॉडीमध्ये गोवंश जातीचे कत्तली केलेल्या जनावरांचे खुरे, हाडे व कातडी हे मिळुन आले. शासनातर्फे बंदी असलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर खरेदी-विकी करणा-या किंवा स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी गोवंश जनावरांची कत्तली करणा-या लोकांचे टोळीत सामील असल्याचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.सुमारे २ लाख २० हजार रु.किंमतीचे अवयव व ३ लाख रु. किमतीचे वाहन असा ५ लाख २० हजार रु.किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे हे करीत आहे.


