;
भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील जाममोहल्ला, ईमलीपुरा भागातील नॅशनल अहले-सुन्नत वल जमात एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट संचलित हाजी अजीज पहेलवान उर्दू गर्ल्स हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.१८ टक्के लागला आहे.
यात अनस शेख इकबाल ही विद्यार्थीनी ८६.४० टक्के गुण मिळवून प्रथम,कबशा फातेमा मोहम्मद जाकीर ८४ टक्के व्दितीय व लुबना अकील शाह या विद्यार्थिनीला ८२.२० टक्के गुण मिळाले असून ती तृतीय उत्तीर्ण क्रमांकाने झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष हाजी शफी पहेलवान,उपाध्यक्ष आफताब खान,चेअरमन हाजी चिराग सेठ,अॅड.एहतेशाम मलिक,सचिव शकील खान,मुख्याध्यापक इरफान शेख व सर्व संचालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.



