बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यमाचा 100 टक्के निकाल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
दि.29 जुलै बुधवार रोजी इ. 10 वीचा ऑनलाईन निकाल घोषित झाला.
येथील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम या शाळेने
घवघवीत यश मिळवत 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक- द्विवेदी अभिनव अभिषेक 92.20 टक्के
द्वितीय क्रमांक- परदेसी आंचल कैलासचंद्र 88.80 टक्के
तृतीय क्रमांक- बडगुजर पुष्कराज गिरीश 88.20टक्के मिळवत यशाचे मानकरी ठरले आहेत. तसेच
मराठी माध्यमाचा प्रथम क्रमांक – सांबरकर गुणवंत गोपाळ 90.60 टक्के
द्वितीय क्रमांक- सानप कुमुद विजय 90 टक्के
तृतीय क्रमांक- पाटील रितू सदाशिव 89.20 टक्के
मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे.
तर बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीदेखील घवघवीत यश संपादन केले . यात बराटे दामोदर संजय 91 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक , तर चौधरी कृष्णल सुधाकर 88 .60 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक , तसेच सोनटक्के उत्कर्ष मोहन 88 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .
तसेच बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून यात सागर प्रकाश शेगोकर 91.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक ,ठाकुर दिपाली संजय 86.80 टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक तर तडवी तमन्ना हैदर हिने 86.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी संगीता बियाणी,विनोद बियाणी, स्मिता बियाणी,रोनक बियाणी,तसेच मुख्याध्यापक डी एम पाटील मुख्या.सोफिया फ्रान्सिस, राजू पारीख,गोपाळ ठाकूर,प्रवीन भराडीया व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *