भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस भुसावळ तालुक्यासह शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविन्यात येवून संपन्न करण्यात आला .
यानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर, यासह गोरगरीबांना अन्नदान , मास्क , सॅनीटायझर , वाटप करण्यात आले .
वरणगावात शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न :
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे वरणगाव येथील प्रभाग क्रमांक १० मधील अभ्यासिकेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे आ . चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार २७ जुलै रोजी रक्तदान शिबिर
घेण्यात आले . प्रसंगी रेड क्रॉस सोसायटी जळगावला संकलित केलेले रक्त देण्यात आले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी , हिरामण पाटील , समाधान पाटील ,सुभाष पाटील, उपतालुका संघटक प्रकाश कोळी, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील कोळी ,सुरेश चौधरी, निळकंठ सरोदे यांच्यासह निलेश सुरडकर ,ठाकूर ,अतुल पाटील, कैलास पाटील पंकज पाटील, राहुल बावणे ,रोहित मुळे, सागर वंजारी, विपुल भंगाळे , मयूर चौधरी, दीपक पाटील, सागर लोंढे, सागर वाघ , दीपक पाटील , शिवा भोई , गोली भोई , विनोद महाजन, वसंत नेहते , यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
प्रसंगी रक्तदान शिबिर स्थळी वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोसावी वरणगावातील गणपती हॉस्पिटलचे डॉ. पी व्ही पाटील, डॉ.वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, युवक काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील, सुदर्शन जाधव, राजू पालीमकर, शिवसेनेचे दिपक धांडे, अँड.कैलास लोखंडे, दिव्यांग सेवक देविदास चौधरी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आकाश कुरकुरे यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
भुसावळ शहरात अन्नदान , मास्क व सॅनीटायझर वाटप ;
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गोरगरीबांना अन्नदान , मास्क व सॅनीटायझर वाटप करण्यात आले .
येथील जेष्ठ शिवसैनिक तथा शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत शर्मा यांनी गोरग़रीब गरजू लोकांना भुसावळ रेल्वे स्टेशन परिसर ,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर ११.३० वाजता अन्नदान वाटप केले . तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून मास्क (भगवा N-95) व सॅनीटायझर वाटप केले .या वेळी सहकारी मित्र राजेश सोनी, मुन्ना तिवारी, पप्पू पटेल ,सागर आदि उपस्थित होते .



