मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांनी मध्य रेल्वेच्या “कोरोना वॉरियर्स” पुस्तिकाचे अनावरण .


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या कोरोना वॉरियर्स या पुस्तिकेचे अनावरण केले.
यावेळी बी.के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक, साकेत मिश्रा सचिव, शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, इत्यादी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मध्य रेल्वेचे विभागाचे प्रमुख आणि सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते.
संजीव मित्तल यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बटण दाबून पुस्तकाची झलक दिली. यावेळी बोलताना संजीव मित्तल म्हणाले की, मध्य रेल्वेच्या डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि कोरोना वॉरियर्सच्या टीमने केलेले समर्पण, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्य दर्शविण्याचा छोटासा प्रयत्न या पुस्तिकामध्ये केला आहे .
पुस्तिका मध्ये फ्रंटलाइन स्टाफ आणि पडद्यामागील कार्य करणारे कर्मचारी, त्यांचा उत्साह आणि कर्तव्यनिष्ठा दर्शवितात. यामध्ये कोविड लॉकडाउन, श्रमिक स्पेशल, लॉकडाऊन दरम्यान करण्यात आलेल्या प्रमुख पायाभूत सुविधांची कामे, वस्तू आणि पार्सल सेवा, , मध्य रेल्वेची मानवी बाजू म्हणजे गरजू लोकांना विनामूल्य भोजन, विनामूल्य किराणा किट वितरण करणारे हे खरे योद्धांचा यामध्ये समावेश आहे. मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेने किट, मुखवटे, सॅनिटायझर वितरण आणि रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांद्वारे वैयक्तिक मदत, माध्यमां मधील कव्हरेज इत्यादी शामिल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *