भुसावळ (प्रतिनिधी )-
नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रु. / मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकालामध्ये शहरातील विविध महाविद्यालयाच्या कला , वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन महाविद्यालयाची यशाची उज्वल पंरपरा नेहमीप्रमाणे या ही वर्षी देखील कायम राखली आहे.
नाहाटा महाविद्यालय
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन महाविद्यालयाची यशाची उज्वल पंरपरा नेहमीप्रमाणे या ही वर्षी कायम राखली आहे. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 95.23 टक्के, वाणिज्य शाखेचा 95.81 टक्के, कला शाखेचा 82.51 टक्के निकाल लागलेला आहे. महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम मंत्री कौस्तुभ दिपक (91.38 टक्के) व व्दितीय पाटील अनिकेत संजीव (91.23 टक्के) तृतीय वारके वरदा दिपक (89.23 टक्के) तसेच वाणिज्य शाखेत प्रथम बसंतानी कोमल नविन (93.38 टक्के) व्दितीय चौधरी हर्षाली जितेंद्र (92.61 टक्के) तृतीय झंवर प्रचिती सुनिल (92.30) व कला शाखेत प्रथम दोदानी संजना धमेंद्र (83.38 टक्के) व्दितीया किनगे निखील दिलीप (77.69 टक्के) तृतीय पिंजारी मुस्कान शेख फरीद (76.46 टक्के) वरील विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतुन महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय आलेले आहेत. तसेच किमान कौशल्य शाखेचा 87.08 टक्के निकाल लागलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी मधुन प्रथम पाटील डिंगबर गणेश (61.07 टक्के), व्दितीय धनगर वर्षा कैलास (58.46 टक्के), तृतीय तायडे भागवत युवराज (58.15 टक्के) आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी मधुन प्रथम बोदडे ज्ञानेश्वर शिवाजी (63.53 टक्के), व्दितीय ढाके मयुर नरेंद्र (62.15 टक्के), तृतीय आमोदकर वैभव कालिदास (60.30 टक्के) तसेच अकॉउंटीग फायनानशीयल व ऑफीस मॅनेजमेंट मधुन प्रथम पाचपांडे निकीता रविंद्र (73.53 टक्के), व्दितीय लोंढे ओमिका किरण (69.69 टक्के), तृतीय महाजन काजल अनिल (68.00 टक्के)
एकंदरीत महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकालाचा विचार करता बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी मध्ये वाटचाल करतील. तसेच वाणिज्य शाखेतुन बरेचसे विद्यार्थी सी.ए. आणि सी.एस मध्ये वाटचाल करतील.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक, चेअरमन महेश देविदास फालक, सेक्रेटरी विष्णु श्रावण चौधरी, संजयकुमार सुशिलकुमार नाहाटा समस्त संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. सौ. एम. व्ही. वायकोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शैलेश बी. पाटील, पर्यवेक्षक यु. बी. नंदाणे आणि शिक्षक व कर्मचारी वृंद या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा
दिल्या आहेत .
के.नारखेडे विद्यालय– कनिष्ठ़ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९८.६९ टक्के, वाणिज्य शाखेचा १०० टक्के व कला शाखेचा निकाल ८८.२३ टक्के लागला. विज्ञान शाखेत प्रथम अपूर्वा विलास भालेराव (९२.३०), व्दितीय श्रृती अनुप जैन (८६), तृतीय काजल गणेश बर्हाटे (८५.८४). कला शाखेत प्रथम नाजमीन अकबर पिंजारी (६१.६९), व्दितीय साक्षी शंकर इंगोले व जयेश प्रदीप माळी (६१.३८), तृतीय नाझिया सलीम गवळी (५८.७७). वाणिज्य शाखेत प्रथम हिमांशू कलमाकर चौधरी (८९.५३), व्दितीय सायली किरण काळे (८८.३०), तृतीय विशाखा लिलाधर बाक्षे (८५.२३). मागासवर्गीयांतून विज्ञान शाखेत प्रथम अश्विन किरण सपकाळे (७८.९२), अपूर्वा विलास भालेराव (९२.३०). वाणिज्य प्रथम चेतन भाईदास पारखे (७७.२३), सायली किरण काळे (८८.३०). कला शाखेत प्रथम अनुराग सुरेश भोई (५०). साक्षी शंकर इंगोले (६१.३८). गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्रीनिवास एन.नारखेडे, उपाध्यक्ष डॉ. संजीव एन. नारखेडे, चेअरमन पी. व्ही. पाटील, सेक्रेटरी डॉ. मकरंद. एन. नारखेडे, डॉ. किशोर नारखेडे, मिलिंद पाटील, विजय भंगाळे, विकास पाचपांडे, प्रमोद नेमाडे, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक एन. बी. किरंगे, उपमुख्याध्यापक आर. ई. भोळे, पर्यवेक्षक वाय.एन. झोपे, पर्यवेक्षक एस. एल. राणे यांनी गुणवंतांचे कौतुक केले.
डी. एस. हायस्कूल-
विज्ञान शाखेचा निकाल ९९ टक्के लागला असून विज्ञान शाखा प्रथम समीक्षा त्रंबक कापेकर (९०), द्वितीय मानसी रवींद्र वायकोळे (८८.९), तृतीय विपुल दिनेश पाटील (८७. ३८). वाणिज्य प्रथम हर्षाली प्रवीण उगले (७५.०७), द्वितीय आरती किशोर शेळके (७२.३०), तृतीय आशिया हसन गवळी(७१.०१). कला विभाग प्रथम गणेश सुरेश शिरसोळे (७२.९२), द्वितीय मनस्वी राकेश भालेराव (७१.२३), तृतीय मोहिनी रवींद्र पाटील (६७.३८) गुणवंत विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा शेख सईदा शफी, चेअरमन मुकेश पाटील, मुख्याध्यापक एस. पी. पाटील, पर्यवेक्षक के.डी.पाटील, शिक्षक, शिक्षकेतरांनी कौतुक केले.
सु.ग.टेमाणे हिंदी कन्या महाविद्यालय
निकाल ९७.७७ टक्के लागला. वाणिज्य विभागात प्रथम अमिशा बानो शे. सलीम (८८.२३), द्वितीय सानिया शे. मुस्ताक अहमद (८४.७६) यांनी पटकावला. गुणवंतांचे संस्थाध्यक्ष जे.टी. अग्रवाल, एम.डी. शर्मा, प्राचार्य मनोज माहेश्वरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
डि.एल. हिंदी विद्यालयातील विज्ञान शाखेची अक्सा सफी उल्लाखान हिने (८१.४७) गुण प्राप्त करुन महाविद्यालयातून दुसरा क्रमांक पटकावला.

प.क. कोटेचा महिला महाविद्यालय
विज्ञान शाखेचा निकाल ९०.१२ टक्के लागला. प्रथम जान्हवी नितीन सराफ (८७.५३). वाणिज्यचा निकाल ८८.६३ टक्के लागला असून प्रथम अंकिता सुनिल घोडेस्वार (८१.८४). कला शाखेचा निकाल ६१.११ लागला असून प्रथम यशस्वी ललित मराठे (८५.६९) प्रथम आली आहे. सर्व विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्षा पद्मा भाभी कोटेचा, संस्था पदाधिकारी, प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य व सर्व प्राध्यापक यांनी केले आहे.
बियाणी ज्युनिअर स्कुल – निकाल शंभर टक्के लागला. वाणिज्य शाखा- प्रथम शेख मोह. हासिम मो. (६९.७६़), सुरवाडे आयुष मिलिंद (६९.७६), जाधव पुष्कराज मनोज (६८.७६), बेंडाळे ऋषिकेश प्रकाश (६८.४६) यांनी यशाची परंपरा कायम राखली विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के लागला. प्रथम पारुल निशिकांत काकडे (८५.०५), द्वितीय शेख अमरीन हनीफ (८३.८४) तृतीय प्रतिक खंडारे (८२.७६), मेघवी विनोद बियाणी (८२), ऐश्वर्या गणेश बडगुजर (७५) गुण मिळवत पहिल्या पाचमध्ये यशाचे मानकरी ठरले विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी सांगिता बियाणी मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सिस यांनी कौतुक केले


