भुसावळात दोन गावठी कट्टयासह आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील नारायण नगर भागातील आरोपीस गावठी कट्टयासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत मुसक्या आवळल्या .
शुक्रवार दिनांक १०जुलै
रोजी ४.३० वाजे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपणीय माहिती वरुन पथकाचे सहायक्क फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ शरीफ काझी,
पो.ना.युनुस शेख, पो ना किशोर राठोड , पोकाँ रणजित जाधव , पो काँ अरुण राजपूत , यांनी भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. भाग ६ सी.आर.नं.७२५ आर्म अँक्ट मधिल आरोपी आकाश गणेश राजपूत राहणार नारायण नगर भुसावळ यास दोन गावठी कट्टे अशा मुद्देमालासह ताब्यात घेतले. पुढील कारवाई साठी आरोपीस वैद्यकीय तपासणी करुन भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *