भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सात नंबर पोलिस चौकीच्या मागून एका आरोपीस गावठी कट्टयासह ताब्यात घेतले असून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे .
शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सात नंबर पोलिस चौकीच्या मागून संशयीत आरोपी प्रीतमसिंग जितेंद्र पाटील वय 25, रा.गणराया विहार, भुसावळ याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टयासह जप्त केला. शुक्रवार १० जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, यापूर्वी आरोपीच्या वडिलांच्या ताब्यातून कट्टा जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही कारवाई शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील, साहिल तडवी, संजीव पाटील, सुनील सैंदाणे, संजय बडगुजर, जितेंद्र सोनवणे, जुबेर शेख, विकास बाविस्कर, संजय ढाकणे यांनी केली. विकास बाविस्कर यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



