भुसावळात देशी दारू जप्‍त,एकास अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील कृष्णा नगर, भिरुड हॉस्पिटलच्या मागे बियाणी शाळेकडे जाणा-या रस्‍त्‍यावर एक इसम विनापरवाना देशी दारुची चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलीसांना मिळाली होती. पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके,
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,भुसावळ बाजारपेठचे पोनि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठचे सपोनि.संदिप परदेशी,पोहेकॉ सुनिल जोशी,पोना.रविंद्र बि-हाडे,नेव्हील बाटली, महेश चौधरी,तुषार पाटील,पोकॉ.कृष्णा देशमुख यांनी तात्‍काळ तेथे जावुन अजय बलराम डुगलज (वय ४५)रा.कृष्णा नगर यांस ताब्‍यात घेतले.
देशी दारुच्‍या मोठ्‍या व लहान अशा ५४ बाटल्‍या असा २ हजार १३२ रूपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍यात पोकॉ.कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादी वरुन प्रोव्हीशन गुरनं.७०७/२०२० मुंपोका.क.६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोना रविंद्र बि-हाडे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *