हावडा अहमदाबाद व हावडा मुंबई मेल या विशेष गाड्या आता आठवङयातून धावणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या वाढत्या दुष्प्रभावामुळे रेल्वेद्वारे काही गाड्यांच्या फेरीमध्ये बदल करण्यात आला आहे. या गाड्या पहिले दररोज चालवण्यात येत होत्या पण आता ह्या गाड्या हप्त्यातून एक दिवस पुढील आदेश येई पर्यंत चालवण्यात येणार आहे.
यामध्ये हावडा – अहमदाबाद विशेष गाडी अप / डाउन ही गाडी १० जुलै २०२० पासून गाडी क्रमांक ०२८३४ अप हावडा – अहमदाबाद विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी हावडा स्थानका वरून ११ :५५ वाजता प्रस्थान रविवारी अहमदाबाद स्थानकावर दुपारी १ :२५ वाजता पोहोचेल
य्या गाडीला हावड़ा ते अहमदाबाद अप दिशा कडे जाणारी गाड़ी क्रंमांक ०२८३४ प्रत्येक शनिवारी भुसावळ विभागातील बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगांव,जलंब स्थानका वर येईल व प्रत्येक रविवारी नांदुरा, मलकापुर, भुसावळ, जळगाव स्थानकावर पोहोचेल.
दिनांक १३ जुलै २०२० पासून गाडी क्रमांक ०२८३३ डाऊन अहमदाबाद -हावडा विशेष गाडी प्रत्येक सोमवारी अहमदाबाद स्थानका वरून १२.१५ वाजता प्रस्थान करेल तर मंगळवारी हावडा स्थानकावर दुपारी १ :३० वाजता पोहोचेल.
प्रवासा दरम्यान ही गाडी अहमदाबाद- हावड़ा डाऊन दिशा कडे जाणारी गाड़ी क्रं – 02833 प्रत्येक सोमवार भुसावळ विभागातील जळगाव , भुसावळ , मलकापूर , नांदुरा , जलंब, शेगाव , अकोला , मूर्तिजापूर , बडनेरा , स्थानकावर पोहोचेल.
हावडा – मुंबई मेल विशेष गाडी अप / डाउन
दिनांक १५ जुलै पासून गाडी क्र- ०२८१० अप हावडा – मुंबई मेल विशेष गाडी प्रत्येक बुधवार रोजी हावडा स्थानका वरून ८ वाजता प्रस्थान शुक्रवार रोजी मुंबई स्थानकावर सकाळी ०५.२० वाजता पोहोचेल.
हावड़ा ते मुंबई अप दिशा कडे जाणारी गाड़ी क्रंमांक ०२८१० प्रत्येक गुरुवारी भुसावळ विभागातील बडनेरा, मुर्तिजापुर , अकोला , शेगांव ,जलंब , नांदुरा, मलकापुर, भुसावळ, जळगाव ,चाळीसगांव ,मनमाड स्थानकावर येईल आणि प्रत्येक शुक्रवारी नासिक, देवळाली स्थानकावर पोहोचेल.
दिनांक १७.जुलै पासून गाडी क्र- ०२८०९ डाऊन हावडा मेल विशेष गाडी प्रत्येक शुक्रवार रोजी मुंबई स्थानका वरून ८.३५ वाजता सुटेल व रविवार रोजी सकाळी ०५.५० वाजता हावडा स्थानकावर पोहोचेल.
मुंबई ते हावड़ा डाउन दिशा कडे जाणारी गाड़ी क्रंमांक ०२८०९ प्रत्येक शनिवारी भुसावळ विभागातील देवळाली, नासिक , मनमाड ,चालीसगांव ,जलगाँव ,
भुसावळ ,मलकापुर , नांदुरा , जलंब , शेगाव , अकोला , मूर्तिजापूर , बडनेरा नासिक स्थानका वर पोहोचेल.असे सूत्रानी कळविले आहे.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *