वरणगावात तंबाखूचा ट्रक पकडला ; आठ लाखांची प्रतिबंधीत तंबाखू जप्त ;


वरणगाव (प्रतिनिधी )-
गुजरात येथून नागपूरकडे तंबाखूजन्य पदार्थ चोरट्या मार्गाने घेऊन जात असल्याची गोपणीय माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी फुलगाव रेल्वे गेटजवळ ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला ट्रकमध्ये भांड्यांच्या खाली लपवलेली व राज्यातील प्रतिबंधीत असलेली सुमारे आठ लाखांची तंबाखू जप्त केली. शनिवारी ही कारवाई करण्यात आली दरम्यान याबाबत सोमवारी अन्न व औषध प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोये व सहकार्‍यांनी फुलगाव रेल्वे गेटजवळ सापळा रचत ट्रक क्रमांक एम.४२ बी.जी.८२६६)) थांबवून तिची तपासणी केली ;असता भांड्याच्या खाली तंबाखू लपवली असल्याचे उघड झाले. सोमवारी अन्न-सुरक्षा विभागाचे के.आर.साळुंखे यांनी फिर्याद दिल्यावरून वरणगाव पोलिसात अन्न सुरक्षा व मानके २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आठ लाखांच्या तंबाखूसह सुमारे ,२० लाखांचा
ट्रक जप्त करण्यात आला. ट्रक चालक व क्लिनर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *