भुसावळ (प्रतिनिधी )-
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ अध्यक्षपदी शीतल भराडे यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा स्वाती देव यांनी चार्टर, पीन व कॉलर देउन शीतल भराडे यांना पदभार सोपवला तर मावळत्या सचिव वंदीता पारे यांनी आपले सुत्रे रूचिका शर्मा यांना सोपवला. असोसिएशन प्रेसिडेंट वसुधा चंद्रचूड व डिस्ट्रिक्ट 303 च्या चेअरमन मिनलजी लाठी, सीसीसीसी रश्मी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा ऑनलाईन पदग्रहण समारंभ पार पडला.
या कार्यकारिणीत खजिनदार कंचन जोशी, आय.एस.ओ.राजश्री कात्यायनी, व्हा.प्रेसिडेंट वंदीता पारे, इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट स्वाती देव, सी.सी.जयश्री दवे, सीसीसीसी सविता शुक्ला आदी पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करून व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून हा कार्यक्रम ऑनलाईन झाला. नूततन अध्यक्षा शीतल भराडे यांनी वर्षभरात राबवण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. भराडे यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .



