दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत सुरू करावे – शिवसेनेची मागणी ; ऊर्जामंत्री यांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत सुरू करावे तसेच
अचानक पणे बंद केलेला कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइमचा मोबदला त्वरित सुरू करावा व वाढणारी बेरोजगारी थांबवावी अशी मागणी येथील शिवसेनेने केली असून अशा आशयाचे निवेदन ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांचेसह व्यवस्थापकीय संचालक श्रीमती ईमेलने शैला , संचालक चंद्रकांत थोटवे , संचालक पुरुषोत्तम जाधव , मंता उपसंचालक हरणे , उपसंचालक यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आले तसेच भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांना प्रत्यक्ष दाखवून देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक शिवसेना विलास मुळे , सागर वंजारी दीपक पाटील, सुनील पाचपोळ यांच्यासह पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *