मराठी नाटकांची समृद्ध परंपरा नव्या पिढीने जपणे आवश्यक-भुसावळातील ज्येष्ठ रंगकर्मींचा परिसंवादात उमटला सूर

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ येथे पाच नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराज पूजन व 
 'शहरातील प्रायोगिक हौशी नाट्य चळवळी पुढील आव्हाने' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक हे होते. 

भुसावळ मधील सर्व नाट्य संस्था आणि कलावंत मिळून एकत्रितरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

परिसंवादात स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र पाटील, उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी, तसेच माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कलारसिक उमेशभाऊ नेमाडे, नाट्य रसिक मनोहर शेठ जाधवानी, आनंद सपकाळे यांनी सहभाग घेऊन स्थानिक पातळीवर नाट्य चळवळी मधील समस्यांवर प्रकाश टाकला. 
  नवीन पिढीने नाटक माध्यमाकडे सकारात्मक दृष्टीने बघून सर्व अडचणींवर मात करून आपल्या मराठी नाटकांची समृद्ध परंपरा जपणे आवश्यक आहे.
असा आशावादी सूर परिसंवादातील सर्व वक्त्यांच्या भाषणांमधून व्यक्त झाला. 

प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी तसेच डॉ.विकास कोळंबे हे सुद्धा उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराज पूजनानंतर रंगकर्मी कुंदन तावडे यांनी नांदीचे सादरीकरण केले. 

यावेळी विद्यापीठ स्तरावर झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात विविध कला प्रकारात विजेत्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुशील पाटील यांनी तर प्रास्ताविक आनंद सपकाळे यांनी केले.

कार्यक्रमास कलाविष्कारचे सचिव धर्मराज देवकर, प्रबोध भावे, राजेंद्र जावळे,कुंदन तावडे, उमेश गोरधे, हारून उस्मानी, मनोहर झांबरे, युवराज कुरकुरे,नारायण माळी,धनराज कुवर, रवींद्र कोळी,चेतन चौधरी,रिया कोल्हे, वैष्णवी बाविस्कर, प्रेरणा देशमुख आणि नाट्य रसिक उपस्थित होते.