भुसावळात १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिर ;

भुसावळ (प्रतिनिधी) : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने भुसावळ येथे वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ब्राह्मण संघ, भुसावळ येथे दिनांक १ ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर दररोज सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत होणार आहे.

या शिबिरासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून, प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य आयोजकांकडून प्रशिक्षणार्थींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

भुसावळ येथील प्रसिद्ध चित्रकार रमाकांत भालेराव हे या शिबिरात वारली चित्रकलेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. पारंपरिक वारली चित्रकलेची ओळख, तिची वैशिष्ट्ये आणि चित्रनिर्मितीचे तंत्र प्रत्यक्ष प्रशिक्षणातून शिकण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून मिळणार आहे.

तरी भुसावळ शहर व परिसरातील कलाप्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि चित्रकलेची आवड असलेल्या इच्छुकांनी या विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.