भुसावळमध्ये गणेश मंडळांना सदिच्छा भेटनवलसिंग राजे पाटील यांच्या हस्ते प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान

भुसावळ ( प्रतिनिधी ) - जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री. नवलसिंग राजे पाटील यांनी भुसावळ शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी विविध गणेश मंडळांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सदिच्छा भेटीदरम्यान श्री. नवलसिंग राजे पाटील यांच्यासोबत शिवसेना गटनेते बबलू बहराटे, शिवसेना नगरसेवक दीपक धांडे, गुर्जर समाज परिसर मंडळाचे सचिव चंद्रशेखर पाटील तसेच प्रमोद यांची उपस्थिती होती.
यावेळी शहरातील मानाचे तसेच प्रमुख गणेश मंडळांना भेट देण्यात आली. त्यामध्ये जय गणेश फाउंडेशन, मातृभूमी गणेश मंडळ, शिवमुद्रा गणेश मंडळ, शिवप्रतिष्ठान गणेश मंडळ, बलाडेश्वर गणेश मंडळ, संतधामचा राजा मंडळ तसेच चोरवड गावातील गणेश मंडळाचा समावेश होता.
प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी श्री. नवलसिंग राजे पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच मंडळांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या सामाजिक व उत्सवातील सहभागाचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनीही श्री. नवलसिंग राजे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी परिसरातील नागरिक, गणेशभक्त आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदिच्छा भेटीमुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली असून परिसरात आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.