भुसावळ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अहमद इब्राहिम कुरेशी

भुसावळ (प्रतिनिधी)-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भुसावळ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अहमद इब्राहिम कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे २१ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. या पत्राची प्रत नवनियुक्त अध्यक्ष अहमद इब्राहिम कुरेशी यांना देण्यात आली आहे.
भुसावळ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर कुरेशी यांच्यावर शहरातील पक्ष संघटना बळकट करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहणार आहे.
या नियुक्तीमुळे भुसावळ शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कुरेशी यांच्या नियुक्तीचे पक्षातील कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जात आहे