काँग्रेस अ.जा. विभागातर्फे कोरोना योद्धांचा होणार सत्कार;


भुसावळ (प्रतिनिधी )-
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहूल गांधी यांच्‍या वाढदिवसानिमित्त काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे उद्‍या दि.१९ जुन शुक्रवार रोजी कोरोना योद्धांचा सत्कार करण्‍यात येणार आहे.
यात भुसावळ शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, महसुल विभाग,सरकारी तसेच खाजगी डाॅक्टर,परिचारीका आदी ज्यांनी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना या संसर्गाशी लढा दिला व देत आहेत अशा कोरोना योद्धांचा गुण गौरव राष्ट्रीय काँग्रेस अनु.जाती विभागाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री ना.डाॅ.नितीन राऊत,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात,काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे,जळगांव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस अनु.जाती विभाग करणार आहे असे काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *