आर्दश ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रितम शिरतुरे यांचा सत्कार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र शासनाचा आर्दश ग्राम विकास अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रितम शिरतुरे यांचा जिल्हा परिषदेतर्फे नुकताच सत्कार करून अभिनंदन करण्यात आले .
प्रितम शिरतुरे यांनी रावेर तालुक्यात तब्बल १९ वर्ष सेवा दिली असून आता ते भुसावळ तालुक्यातील खडका व साकरी येथे दिड वर्षा पासुन सेवा देत आहे.
रावेर तालुक्यात शिरतुरे यांनी के-हाळा बु, पिंप्री,चोरवड, अजनाड, येथे सेवा दिली आहे.तर सर्वाधिक सेवा ऐनपुर येथे आठ वर्ष दिली आहे.येथे असतांना त्यांनी शासना कडून मिळणारे सर्व पुरस्कार ऐनपुर (ता रावेर) यांना मिळवुन दिले आहे.त्यांनी वसूली, अपंगाचा खर्च,शासनाचे विविध अभियान राबविणे, घरकुल, दलित वस्ती, इत्यादी योजना प्रभावी पणे राबविल्या आहे. तसेच यापुर्वी जिल्हाच्या आर्दश ग्राम सेवक पुरस्कार देखिल शिरतुरे यांना मिळाला आहे. जनता व सरपंच सदस्य यांच्या कमालीचा समन्वयक साधुन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे म्हणून ते संपूर्ण तालुक्यात चांगलेच परीचित आहे.
यांनी केला सत्कार –
हा पुरस्कार मिळल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील,उपाध्यक्ष लालचंद पाटिल, झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील ,यांचे हस्ते प्रितम शिरतुरे यांचा सत्कार करण्यात आला.तर रावेर व भुसावळ तालुक्यासह जिल्हाभरातील ग्राम सेवक, विविध राजकीय पदाधिकारी,व जनतेतुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *