जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप अल्पसंख्याक मोर्चा जळगाव जिल्हातर्फे गोलाणी मार्केट परिसरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मुसळधार पाऊस असतानाही रक्तदात्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, दिवसभरात एक ५६ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचा शुभारंभ आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदारांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक परदेशी, उदय भालेराव, पितांबर भावसार, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परवेज पठाण आणि उपाध्यक्ष वसीम खान, जहांगीर खान, यांची प्रमुख उपस्थिती होती. हे शिबीर 'रेड प्लस रक्तपेढी' च्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. पावसामुळे आलेल्या अडथळ्यांवर मात करत नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. शिबीरादरम्यान अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते जिल्हा सचिव इस्माइल शेख, उपजिल्हाध्यक्ष जब्बार शेख, अफसर शेख आणि अब्दुल हमीद यांच्या सह जमीर नागोरी, ऍडव्होकेट शरीफ शेख, इरफान शेख, पदाधिकाऱ्यांची निवड करून नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जहांगीर खान, संजय वराडे, मोहसीन पठाण, शोएब शेख, फहीम खान, सेजील पठाण, हसन शेख, आमीर सैय्यद, जमीर नागोरी, फिरोज पठाण, राम वराडे, आसीफ पठाण, योगेश माळी, शैलेश परदेशी, रफीक ठेकेदार,जमील शेख, यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


