मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकेरी विशेष गाड्या ;

मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मिरज ते नागपूर, नवी अमरावती आणि पंढरपूर ते भुसावळ मार्गांवर आषाढी एकादशी एकेरी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तपशील पुढीलप्रमाणे :

1) मिरज ते नागपूर एकेरी विशेष गाडी (1 फेरी)
गाडी क्रमांक 01451 एकेरी विशेष दिनांक 26.07.2026 रोजी मिरज येथून 12.55 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी नागपूर येथे 12.25 वाजता पोहोचेल.
थांबे: आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढाळगाव, जत रोड, म्हसबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी.
रचना : 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 3 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन.

2) मिरज ते नवी अमरावती एकेरी विशेष गाडी (1 फेरी)
गाडी क्रमांक 01453 एकेरी विशेष 26.07.2026 रोजी मिरज येथून 16.00 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी नवी अमरावती येथे 12.50 वाजता पोहोचेल.
थांबे: आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढाळगाव, जत रोड, म्हसबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, नांदगांव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, आणि बडनेरा.
रचना : 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 3 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन.

3) पंढरपूर ते भुसावळ एकेरी विशेष गाडी (1 फेरी)
गाडी क्रमांक 01459 विशेष दिनांक 27.07.2026 रोजी पंढरपूर येथून 22.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी भुसावळ येथे 13.00 वाजता पोहोचेल.
थांबे : कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव.
रचना : 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 1 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 8 शयनयान, 8 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन.

आरक्षण :- गाडी क्रमांक 01451, 01453 आणि 01459 साठीचे आरक्षण दिनांक 23.07.2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या [www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

प्रवाशांनी टिकट बुकिंगसाठी RailOne अॅपचा वापर करावा . 
सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे.