भुसावळ – दादर एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालवणार

 
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून खालील गाड्या सुधारित संरचनेसह चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे:

* गाडी क्र. 09049 दादर – भुसावळ विशेष, दिनांक 12.06.2026 पासून दादर येथून सुटेल.
* गाडी क्र. 09050 भुसावळ – दादर विशेष, दिनांक 12.06.2026 पासून भुसावळ येथून सुटेल.
* गाडी क्र. 09051 दादर – भुसावळ विशेष, दिनांक 13.06.2026 पासून दादर येथून सुटेल.
* गाडी क्र. 09052 भुसावळ – दादर विशेष, दिनांक 13.06.2026 पासून भुसावळ येथून सुटेल.
* गाडी क्र. 19003 दादर – भुसावळ एक्सप्रेस, दिनांक 16.06.2026 पासून दादर येथून सुटेल.
* गाडी क्र. 19004 भुसावळ – दादर एक्सप्रेस, दिनांक 16.06.2026 पासून भुसावळ येथून सुटेल.

सुधारित रचना - 01 वातानुकूलित प्रथम-द्वितीय श्रेणी, 01 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 04 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 09 शयनयान श्रेणी, 04 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 02 सामान व गार्ड ब्रेक व्हॅन. 

या गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.

प्रवाशांनी कृपया वरील बदल लक्षात घेऊन प्रवास करावा.