भुसावळ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरात 86 ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा घेतला लाभ.

भुसावळ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव, तसेच
जोगाई माता सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ आणि आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबिर दिनांक 6 जून 2026(शनिवार) रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत 
नवजीवन हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र, पांडुरंग टॉकीजच्या मागे, 
श्री व्यंकटेश बालाजी मंदिरासमोर,
टिंबर मार्केट, भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 
रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, हृदयरोग तपासणी व डोळ्यांची तपासणी तसेच मोफत अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या,
सर्वप्रथम धन्वंतरी चे पूजन व 
दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन गोल्ड सिटी हॉस्पिटलचे संचालक
 डॉ संदीप भारुडे आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उमेंद्र  वाघचौरे चव्हाण ऑप्टिकलचे संचालक सुमित चव्हाण आणि श्री. मधुकर राऊत अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती रजनी बडगुजर यांनी शिबिराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले
आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाने या शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे व संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व त्यांनी सुदृढ जीवन जगावे या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन दिनांक 6 जून रोजी भुसावळ येथे दिनांक 10 जून रोजी जळगाव येथील पोलीस पद्मालय हॉल एसपी ऑफिस येथे तसेच यावल येथील रुरल गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे 12 जून रोजी आणि रावेर येथील रुरल गव्हर्मेंट हॉस्पिटल येथे 14 जून रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत तरी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आपल्या प्रस्तावनेत आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ वंदना वाघचौरे यांनी सांगितले
प्रसंगी डॉ.संदीप भारुडे यांनी ईसीजी काढून आणि हृदयाची कशी काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करून उपस्थित जेष्ठ नागरिकांची तपासणी केली, 
तसेच उपस्थित जेष्ठ नागरिकांची डोळ्यांची तपासणी करून वाढलेल्या नंबरचे चष्मे सवलतीच्या दरात करून देण्याचे उपस्थित जेष्ठ नागरिकांना सांगितले आणि सुदृढ जीवन शैलीसाठी श्री मधुकर राऊत यांनी योगा आणि ध्यानधारणा किती आवश्यक आहे यासंदर्भात मार्गदर्शन करून उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकून घेतली, 
या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मनीषा बाविस्कर
यांनी केले आणि सरते शेवटी अंजुम खान यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले, या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नवजीवन हॉस्पिटल चा संपूर्ण स्टाफ आणि अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले ,
जळगाव, यावल, रावेर या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या मोफत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य शिबिरासाठी अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे
8991888699
9511229212
9665098146