भुसावळ (प्रतिनिधी) – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अध्यक्ष मनिषा पाटील व पदाधिकारी यांनी माल्यार्पण करून पूजन केले. याप्रसंगी ज्योती राणे यांनी त्यांच्या जीवनाविषयी विचार मांडले. नारीशक्तीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्याविषयी नूतन तासखेडकर व आशा मौर्य यांनी माहिती सांगितली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन रयतेच्या उद्धारासाठी अर्पण केले. आजही त्यांच्या कार्याची साक्ष त्यांनी निर्माण केलेल्या विविध मंदिरे,घाट,धर्मशाळा देत आहे. याप्रसंगी किमया पाटील हर्षा गुजराती, माधुरी शिंपी अस्मिता सरवैया उपस्थित होत्या. त्यांचा आदर्श घेऊन नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेचे कामकाज करावे असे माधुरी शिंपी व हर्षा गुजराती यांनी सुचवले.



