भुसावळ (प्रतिनिधी) : नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची सन २०२६-२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली असून, अध्यक्षपदी सौ. मनिषा पाटील यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी श्रीमती ज्योती राणे यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी वंदना मंडावरे, जयश्री महाजन, लीना पाटील व विद्या जकातदार यांची निवड झाली आहे. सचिव म्हणून ज्योती राणे तर सहसचिवपदी नूतन तासखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोषाध्यक्षपदी आशा मौर्य तर सहकोषाध्यक्षपदी किमया पाटील यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून माधुरी शिंपी, नेहा जगताप, रेणुका हिंगू, हर्षा गुजराती व संगीता चौधरी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. सीमा जाधव व अॅड. प्रिया नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसिद्धीप्रमुखपदी सोनम विजया रवींद्र पाटील, राधिका पाटील, श्रावणी पाटील व तेजल वनरा यांची निवड झाली आहे.
स्वागताध्यक्ष म्हणून नीलिमा नायर व स्मिता पाटील यांची तर सदस्य म्हणून शोभना मकवाना, पूर्वी शाह, अनिता चौधरी, मंगला खडके आणि पूजा हिंगू यांचा समावेश करण्यात आला आहे.
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या मागील कार्यकाळातील उल्लेखनीय समाजोपयोगी कार्यामुळे नव्या कार्यकारिणीचे विविध स्तरांतून स्वागत, अभिनंदन व कौतुक होत आहे. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यातही महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे.


