एआय सर्वांसाठी’ ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन : विश्व मराठी परिषदेतर्फे 26 ते 29 मे दरम्यान विशेष प्रशिक्षण उपक्रम :

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही काळाची गरज बनत असताना, सर्वसामान्यांना एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि सुरक्षित वापर शिकवण्यासाठी यांच्या वतीने ‘एआय सर्वांसाठी’ या विशेष ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा 26 ते 29 मे 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी 8 ते 9 या वेळेत Zoom माध्यमातून पार पडणार असून सहभाग शुल्क केवळ 799 रुपये ठेवण्यात आले आहे.

कार्यशाळेसाठी सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते आणि एआय व आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मार्गदर्शक हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत ChatGPT, Gemini यांसारख्या आधुनिक एआय साधनांची ओळख, योग्य ‘प्रॉम्प्ट’ देण्याचे तंत्र, लेखन सहाय्यक म्हणून एआयचा वापर, ब्लॉग, बातम्या, स्क्रिप्ट लेखन, आकर्षक फोटो-व्हिडिओ निर्मिती, भाषांतर, रिसर्च आणि तथ्य पडताळणी यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच शिक्षकांसाठी लेसन प्लॅन, प्रश्नपत्रिका आणि प्रेझेंटेशन तयार करण्याच्या पद्धती, पत्रकार आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींसाठी न्यूज स्क्रिप्ट, हेडलाईन तयार करण्याचे तंत्र, तसेच फेक न्यूज आणि डेटा प्रायव्हसीसंदर्भात सुरक्षित एआय वापराचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

ही कार्यशाळा नवोदित लेखक, संशोधक, पत्रकार, ब्लॉगर, शिक्षक, प्राध्यापक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन जीवनात एआयचा प्रभावी वापर करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

मर्यादित प्रवेश असलेल्या या कार्यशाळेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असून सर्व सहभागींना रेकॉर्डिंग आणि ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

नोंदणीसाठी :

अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक प्रा. अनिकेत पाटील यांच्याशी 7507207645 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.