प्रवाश्यांना दिलासा: नागपूर- मडगांव विशेष गाडीचे नियमित सेवेत रूपांतर

भुसावळ (प्रतिनिधी)– विदर्भ तसेच कोकण/गोवा भागांमधील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने रेल्वेने नागपूर आणि मडगांव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित गाड्या म्हणून चालवल्या जातील, यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, विश्वासार्ह आणि नियमित सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक 01139/01140 नागपूर- मडगांव विशेष गाड्यांचे खालीलप्रमाणे नियमित सेवांमध्ये रूपांतर केले जाईल:

  • गाडी क्रमांक 11203 नागपूर ते मडगांव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक बुधवार आणि शनिवार रोजी दिनांक १६.०५.२०२६ पासून नागपूर येथून
  • गाडी क्रमांक 11204 मडगांव ते नागपूर द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक गुरुवार आणि रविवार रोजी दिनांक १७.०५.२०२६ पासून मडगांव येथून

नियमित रेल्वे सेवांचा तपशील:
गाडी क्रमांक 11203 द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १६.०५.२०२६ पासून प्रत्येक बुधवार आणि शनिवार रोजी नागपूर येथून १५.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगांव येथे १७.४५ वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक 11204 द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १७.०५.२०२६ पासून प्रत्येक गुरुवार आणि रविवार रोजी मडगांव येथून २०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे २१.२५ वाजता पोहचेल.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाली.
संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन.

या गाड्यांच्या सविस्तर वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

प्रवाशांनी कृपया गाडी क्रमांकातील बदलाची नोंद घ्यावी.