पुणे : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ अर्थात तर्फे भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे “पुरी – कामाख्या – बैद्यनाथ धाम यात्रा” आयोजित करण्यात आली असून, ही विशेष आध्यात्मिक यात्रा 25 जून 2026 रोजी पुणे येथून प्रस्थान करणार आहे. 11 रात्री व 12 दिवसांच्या या यात्रेत देशातील प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

या यात्रेदरम्यान भाविकांना , , , तसेच या प्रसिद्ध धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. या सर्व सुविधा असलेल्या पॅकेजची सुरुवात फक्त ₹22,770 प्रति व्यक्तीपासून होत आहे.
IRCTC पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा यांनी सांगितले की, विशेष एसी व नॉन-एसी पर्यटक ट्रेनद्वारे प्रवाशांना आरामदायी प्रवासासह भारताच्या समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेता येणार आहे.
या यात्रेसाठी प्रवाशांना इकोनॉमी स्लीपर (SL), स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2AC अशा विविध श्रेणींचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुमारे 750 प्रवाशांची क्षमता असलेली ही ट्रेन पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव जंक्शन, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर आदी स्थानकांवर चढणे व उतरण्याची सुविधा देणार आहे.
पॅकेजमध्ये 2AC, 3AC व नॉन-एसी स्लीपरमधील रेल्वे प्रवास, बजेट हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, शुद्ध शाकाहारी भोजन, एसी/नॉन-एसी ट्रान्सफर, पर्यटन स्थळांचे दर्शन, संपूर्ण प्रवासासाठी विमा संरक्षण तसेच IRCTC चे अनुभवी टूर मॅनेजर यांचा समावेश आहे.
IRCTC पश्चिम विभागाचे प्रवक्ते डॉ. ए.के. सिंह यांनी सांगितले की, प्रवाशांच्या आरोग्य व सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून यात्रेसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पॅकेज शुल्कानुसार इकोनॉमी क्लास (स्लीपर) ₹22,770, स्टँडर्ड क्लास (3AC) ₹39,620 आणि कम्फर्ट क्लास (2AC) ₹52,860 इतके निश्चित करण्यात आले आहे.
बुकिंग सुरू झाली असून इच्छुक प्रवाशांनी IRCTC Tourism Portal वर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8287931886 या क्रमांकावर किंवा वर संपर्क साधता येईल.
आध्यात्मिक ऊर्जा, प्राचीन परंपरा आणि आरामदायी प्रवासाचा संगम असलेल्या या विशेष यात्रेसाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने भाविकांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन IRCTC तर्फे करण्यात आले आहे.


