भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या नव्या ६६० मेगावॉट प्रकल्पाच्या ‘भेल यार्ड’ परिसरात बुधवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीची तीव्रता एवढी होती की, परिसरात दूरवर आकाशात धुराचे लोट पसरले होते. सुदैवाने, यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

भेल यार्डाच्या संरक्षण भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणावर सुकलेले गवत वाढले होते. कडक उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे हे गवत पूर्णतः वाळलेले असल्याने, बुधवारी सकाळच्या सुमारास या सुकलेल्या गवताला अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. हवेमुळे आग झपाट्याने पसरली आणि धुराचे प्रचंड लोट थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने काही काळ प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच औष्णिक वीज केंद्राच्या स्वतःच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी
कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी
स्थानिक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भेल यार्ड परिसरात उन्हाळ्यात सुकलेल्या गवतामुळे आगी लागण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे किंवा एखाद्या किरकोळ ठिणगीमुळेही हे वाळलेले गवत तत्काळ पेट घेते. “यार्ड परिसरातील वाळलेले गवत तातडीने कापून नियमित स्वच्छता राखणे गरजे आहे. प्रशासनाने येथे कायमस्वरूपी अग्निशमन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
चारही बाजूंनी पाण्याचा जोरदार मा सुरू केला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर का वेळातच आगीवर पूर्ण नियंत्र मिळविण्यात जवानांना यश आले.


