राज्यस्तरीय पद्म विद्या रत्न पुरस्कार 2026 प्रदान – जितेंद्र प्रताप सिंग पाटील यांचा गौरव

भुसावळ – राज्यस्तरीय पद्म विद्या रत्न पुरस्कार 2026 सोहळ्यात जितेंद्र प्रताप सिंग पाटील सर यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि लक्ष्मण रावजी ढोबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी पाटील सर यांचा सत्कार करून त्यांना ट्रॉफी देण्यात आली. हा क्षण त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा आणि अभिमानास्पद ठरला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.