काकीनाडा टाऊन ते हिसार विशेष गाडीचे नियमित सेवेत रूपांतर :

भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वेने काकीनाडा टाऊन आणि हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडी नियमित केल्या आहेत. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित गाड्या म्हणून चालवल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांची सोय वाढेल आणि कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल. सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक 07717/07718 काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक विशेष गाड्यांचे खालीलप्रमाणे नियमित सेवांमध्ये रूपांतर केले जाईल:

गाडी क्रमांक 17295 काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १२.०५.२०२६ पासून काकीनाडा टाऊन येथून

गाडी क्रमांक 17296 हिसार ते काकीनाडा टाऊन साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १५.०५.२०२६ पासून

नियमित रेल्वे सेवांचा तपशील:
गाडी क्रमांक 17295 साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १२.०५.२०२६ पासून दर मंगळवार रोजी काकीनाडा टाऊन येथून ०५.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हिसार येथे १०.२० वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक 17296 साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १५.०५.२०२६ पासून दर शुक्रवार रोजी हिसार येथून १४.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी काकीनाडा टाऊन येथे २१.३५ वाजता पोहचेल.

थांबे – काकिनाडा टाऊन, सामलकोट, राजमुंद्री, तादेपल्लीगुडम, एलुरु, विजयवाडा, गुटूर, मिरयालगुडा, नालगोंडा, चार्लापल्ली, मेडचल, कामारेड्डी, निझामाबाद, बासर, धर्माबाद, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मंदसोर, नीमच, चित्तौरगढ, भिलवारा, बिजेनगर, नासिराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा, रींगस जंक्शन, सिकर, नवलगढ़, झुनझुनू, चिड़ावा, लोहारू, सदूलपूर आणि हिसार.

संरचना: २ वातानुकूलित प्रथम, ३ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन.

या गाड्यांच्या सविस्तर वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

प्रवाशांनी कृपया गाडी क्रमांकातील बदलाची नोंद घ्यावी.