भुसावळ विभागात बल्लारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला शेगांव स्थानकावर अतिरिक्त थांबा


भुसावळ (प्रतिनिधी) – प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ विभागातील शेगांव स्थानकावर बल्लारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे –

गाडी क्रमांक 22110 बल्लारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस प्रवास सुरु दिनांक 06.05.2026 पासून शेगांव स्थानक येथे दिनांक 06.05.2026 पासून आगमन वेळ 19.49 वाजता व प्रस्थान वेळ 19.50 वाजता असेल.

गाडी क्रमांक 22109 लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह एक्सप्रेस, प्रवास सुरु दिनांक 12.05.2026 पासून शेगांव स्थानक येथे दिनांक 13.05.2026 पासून आगमन वेळ 06.02 वाजता व प्रस्थान वेळ 06.03 वाजता असेल.

या गाड्यांच्या थांब्याबाबत व वेळापत्रकासंबंधी सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घ्यावा.