भुसावळ विभागातील भादली–जळगाव खंड दरम्यान आरएच (मर्यादित उंची) गर्डर बसविण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण

भुसावळ (प्रतिनिधी)- दिनांक ०५.०५.२०२६ रोजी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली – जळगाव खंड दरम्यान पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी महत्त्वाचे काम नियोजित ब्लॉक दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

या कामांतर्गत ब्रिज क्रमांक ४२३/१ व ४२३/२ येथे आरएच (मर्यादित उंची) गर्डर यशस्वीरित्या बसविण्यात आले. सदर कामामुळे लहान स्पॅनच्या विद्यमान रेल टॉप स्लॅबच्या जागी आरसीसी (Reinforced Cement Concrete) बॉक्स सेगमेंट पुश करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. दोन्ही ठिकाणी हे काम नियोजित वेळेत सुरक्षित व सुरळीतरीत्या पूर्ण करण्यात आले.

कामाच्या अंमलबजावणीसाठी अप लाईनवर ५ तास व डाउन लाईनवर ३ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीत सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

या कामांच्या पूर्णत्वामुळे जळगाव–भादली दरम्यान प्रस्तावित ५व्या लाईनच्या ट्रॅक लिंकिंग कार्याला सातत्य मिळणार असून, भविष्यात रेल्वे वाहतूक क्षमता व परिचालन कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.

भुसावळ विभाग सुरक्षित, सुरळीत व अधिक कार्यक्षम रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण व क्षमता वृद्धीसाठी सातत्याने कटिबद्ध आहे.