भुसावळ (प्रतिनिधी)- येथिल राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी इयत्ता १२ वी च्या परीक्षेत २०२५/२६ या वर्षात भरघोस यश संपादन केले आहे.
इयत्ता १२ वी सायन्स शाखेतील प्रथम क्रमांक : पिहुल ओम सुनील ८०%,
द्वितीय क्रमांक: बाविस्कर सिध्दांत अनंत ७९.५०%, गढीयाली फातिमा मुस्तफा ७९.५०%, .विकास सोनटक्के ७९.५०%, महाजन दिशा संदीप ७९.५०% तर
तृतीय क्रमांक शक्य रिया रविकुमार ७९. ३३%, पलक जितेंद्र सुरंगे ७९.३३% गुण
मिळवून यश संपादन केले आहे.
तसेच वाणिज्य शाखेत प्रथम: काजल संजय गोसावी ६५.३३%
द्वितीय :वैष्णवी अशोक श्रीवास ६१.८३%
तृतीय: आदित्य शेखर चौधरी ६०.३३%
पटकावून मान मिळवत यशाची परंपरा राखली आहे. सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन बियाणी एज्यूकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी,एक्झिकेटिव्ह डायरेक्टर रोनक बियाणी,पियुष बियाणी,आयुषी बियाणी,प्रिंसिपल रुद्रसेन गंठिया यांनी केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



