भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दोन महत्त्वाच्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांच्या नियमित सेवांना प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांदरम्यान जलद व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या गाड्यांच्या उद्घाटन विशेष फेऱ्यांना भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 28.04.2026 रोजी वाराणसी येथे हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
१) हडपसर–बनारस–हडपसर अमृत भारत एक्सप्रेस (दैनिक)
गाडी क्र. 22590 हडपसर–बनारस अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 04.05.2026 पासून दररोज हडपसर येथून 07.50 वाजता सुटेल व पुढील दिवशी बनारस येथे 14.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 22589 बनारस–हडपसर अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 02.05.2026 पासून दररोज बनारस येथून 18.15 वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी हडपसर येथे 00.10 वाजता पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज जंक्शन व ज्ञानपूर रोड.
२) लोकमान्य टिळक टर्मिनस–अयोध्या कॅन्ट.–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक)
गाडी क्र. 22111 लोकमान्य टिळक टर्मिनस –अयोध्या कॅन्ट. अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 05.05.2026 पासून प्रत्येक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 07.55 वाजता सुटेल व पुढील दिवशी अयोध्या कॅन्ट. येथे 10.15 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 22112 अयोध्या कॅन्ट.–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस दिनांक 06.05.2026 पासून प्रत्येक बुधवारी अयोध्या कॅन्ट येथून 13.50 वाजता सुटेल व पुढील दिवशी 15.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगढ व सुलतानपूर.
गाडीची रचना (दोन्ही गाड्यांसाठी समान) – 08 स्लीपर क्लास डबे, 11 जनरल सेकंड क्लास डबे, 01 पॅन्ट्री कार आणि 02 सेकंड सिटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन.
*आरक्षण (Reservation): अमृत भारत एक्सप्रेस गाडी क्र. 22590 आणि 22111 साठी आरक्षण दि. 02.05.2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या गाड्यांच्या सविस्तर वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
ही नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सेवा प्रवाशांना अधिक सोयीस्कर, किफायतशीर व आरामदायी प्रवासाचा अनुभव देईल तसेच महाराष्ट्र व उत्तर भारतातील धार्मिक व व्यावसायिक केंद्रांना अधिक सक्षमपणे जोडेल.


